प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा : मुख्यमंत्री

02 Nov 2018 12:30:53



मुंबई : "दिवाळी साजरी करताना नागरिकांनी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होईल अशी दक्षता घ्यावी." असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले की, "गेल्या वर्षी फटाके फोडण्याचे प्रमाण कमी होते. मुंबईसह राज्याचे प्रदूषण कमी झाले होते. यामध्ये शाळकरी मुलांचा मोठा सहभाग होता. मुलांमध्ये पर्यावरणविषयक जागृती झाली असून यंदाही मुलांनी आणि पालकांनी कमी आवाजाचे फटाके वाजवून पर्यावरणपूरक, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करतील अशी आशा आहे."

 

राज्यभर प्लास्टिक बंदीची मोहीम उत्तम सुरु आहे. त्याला नागरींकडूनही चांगला प्रतिसाद दिला आहे. ध्वनिप्रदूषण, फटाके मुक्त दिवाळी आणि प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र अशा मोहिमा यशस्वीपणे राबविण्यासाठी पर्यावरण विभाग काम करीत आहे. या सर्व मोहिमांमध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा असेही मुख्यमंत्रांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0