'वंदे मातरम' ने हिवाळी अधिवेशनाची सुरुवात

19 Nov 2018 17:00:43


 

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. यावेळी विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे कामकाज 'वंदे मातरम' ने सुरु करण्यात आले. विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्रिमंडळ आणि विधिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. तर विधानपरिषदेमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसूलमंत्री तथा सभागृह नेते चंद्रकात पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.

 

विधानपरिषदेच्या तालिका सभापतींची निवड

 

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानपरिषदेचे तालिका सभापतींची निवड केली. यामध्ये प्रवीण दरेकर, डॉ.नीलम गोऱ्हे, जगन्नाथ शिंदे, अमरनाथ राजूरकर, दत्तात्रय सावंत यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली.

 

नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय

 

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला महसूलमंत्री तथा सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी परिचय करून दिला. या सदस्यांमध्ये सर्वश्री पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सविकासमंत्री महादेव जानकर, जयंत पाटील, ॲड. अनिल परब, शरद रणपिसे, डॉ. मनीषा कायंदे, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, बाबाजानी दुर्राणी, विजय ऊर्फ भाई गिरकर, अरुण अडसड यांचा समावेश होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0