आरक्षण मिळणारच; मोर्चे काढून अडथळे आणू नका

17 Nov 2018 16:36:43


 


औरंगाबाद : “मोर्चे काढून आणि आंदोलन करून आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नका.” असे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. फुलंब्री विधानसभा मतदार संघातील सावंगी गावात विविध रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा शनिवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.

 

सरकारकडून मोठी कायदेशीर फळी उभी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूने सकारात्मक अहवाल तयार करण्यात आला आहे. आंदोलने आणि मोर्चे काढून मराठा आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नका.” असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा समाजाने सहकार्य करावे, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.

 
या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, आमदार अतुल सावे, वैज्ञानिक महामंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, भाजपच्या प्रभारी महिला जिल्हाध्यक्ष अनुराधाताई चव्हाण, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, बाजार समितीचे संचालक विलास उबाळे, भाजयु मोर्चाचे तालुकाध्यक्ष विकास गायकवाड, शहराध्यक्ष योगेश मिसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0