‘टाटा स्टील’च्या तिमाही नफ्यात तिप्पट वाढ

14 Nov 2018 16:53:56



मुंबई : देशातील सर्वात जूनी स्टील उत्पादक कंपनी टाटा स्टीलने , ११६. कोटी रुपयांचा तिमाही नफा नोंदवला आहे. सप्टेंबर तिमाहीच्या निकालांची माहीती कंपनीने गुरुवारी मुंबई शेअर बाजाराला दिली. गतवर्षी याच तिमाहीत कंपनीला ,०१७. कोटींचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा आकडा तिपट्टीने वाढला आहे. या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ४३ हजार ८९८.५३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा ३२ हजार ६७५. कोटी रुपये इतके होते.

 

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा स्टीलने एकूण बाजारपेठेतील परिस्थिती लक्षात घेता उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बाजारात आव्हानात्मक परिस्थिती असतानाही कंपनीची कामगीरी टाटा स्टील आणि भूषण स्टीलने ४३. लाख टन पोलाद विक्री केली आहे.टाटा स्टीलने प्रक्रियेदरम्यान व्याज, कर, आणि घसारा वगळता प्रतिटन १९ हजारांचा नफा नोंदवला आहे. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वाधिक नफा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

शेअर घसरला

मंगळवारी टाटा स्टीलचा शेअर रुपयांवर शेअर ५८९ रुपयांवर बंद झाला होता. बुधवारी शेअर ६०६ रुपयांच्या उच्चांकावर उसळला. तिमाही निकालानंतरही शेअर .८० टक्क्यांनी घसरुन ५८४.५० वर बंद झाला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0