28 हजारांच्या ऐवजासह महिलेस बॅग परत

12 Nov 2018 10:21:06

पाचोरा येथील रेल्वे पोलीस ईश्वर बोरूडे यांचा प्रामाणिकपणा


पाचोरा, 11 नोव्हेंबर
येथील रेल्वे स्थानकावर बेवारस बॅग रेल्वे पोलिस ईश्वर बोरूडे यांना आढळून आली होती. त्यांनी ही बॅग पोलिस चौकीत आणून दिली.
 
तपासणीनंतर या बॅगेत 10 हजाराची रोकडसह सोन्याचे चांदीचे दागिने मिळून आले ही बॅग उत्तरप्रदेशातील महिलेचे असल्याचे कळल्यानंतर तिला तिची बॅग रोकड रक्कमेसह सुपूर्द करण्यात आली.रेल्वे पोलिस बोरुडे यांच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला तिचे दागिने पैसे परत मिळाले आहेत.
 
8 नोव्हेंबर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पवन एक्सप्रेस पाचोरा रेल्वेस्टेशनवर प्लॅट फार्म क्रमांक दोनवर आली. यावेळी दिवाळी निमित्त गाड्यांना असलेली गर्दी पाहता रेल्वे पोलीस हेड .कॉ ईश्वर बोरुडे हे रेल्वेस्टेशनवर पेट्रोलिंग करीत होते.
 
यादरम्यान एक बॅग त्यांना बॅग बेवारस स्थितीत आढळून आली. त्यांनी ही बॅग ताब्यात घेऊन पोलीस चौकीत आणून त्या बॅगेची तपासणी केली. त्या बॅगेत 10 हजार रुपयांची रोख रोकड रकमेसह 3 ग्रॅम सोन्याचे झुमके, पैंजण 2 जोड,व 4 जोडवे ,5 हजार रुपये किंमतीचे नवे कपडे असा एकूण सुमारे 28 हजाराचा ऐवज आढळून आला.
 
तसेच काही महत्वाची कागदपत्रे व एक नोकिया कंपनीचा मोबाईल बंद स्थितीत आढळून आला. त्यात दोन मोबाईल नंबर आढळून आले. मोबाईल नंबरच्या आधारावर रेल्वे पोलीस हेड.कॉ.ईश्वर बोरुडे यांनी चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रवासी महिलेशी फोनवरून संपर्क साधला असता संबंधित महिलेस बेवारस स्थितीत आढळून आलेल्या बॅगेविषयी माहिती दिली.
 
तिने ती बॅग आपलीच बॅग असल्याबाबत सांगितले. 10 रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास प्रवासी महिला पूनम पांडे (35) रा.मीरपूर, कळवाळ, जिल्हा जौनपूर, उत्तरप्रदेश ही महिला पाचोरा रेल्वे पोलीस स्टेशनला आली. रोख रकमेसह मौल्यवान वस्तूची बॅग प्रवासी महिलेस सुपूर्द करण्यात आली.
  
प्रवासी महिलेचा पती अवघेश पांडे हा मुंबई येथे रिक्षा चालक आहे. यावेळी प्रवासी महिला पूनम पांडे व तिचा भाऊ यांनी पोलीस हेड.कॉ.ईश्वर बोरुडे यांनी केलेल्या कामगिरीबाबत कौतुक करीत आभार मानले.
Powered By Sangraha 9.0