पाचोरा, सम्राटनगरात घाणीचे साम्राज्य

12 Nov 2018 10:12:51

पाचोरा, 11 नोव्हेंबर
येथील सम्राट अशोकनगरमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून ,रहिवाश्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकी कडे शासनाकडून स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे परंतु पाचोर्‍यात मात्र स्वच्छ अभियान कागदावरच दिसत आहे.
 
सम्राट अशोक नगरमध्ये दलित मागासवर्गीय लोक राहतात. घाणीमुळे रहिवाशी आजारी पडत आहे.दुष्काळी परिस्थिती असल्याने हाताला काम नाही. दवाखान्यात जाण्यासाठी पैसा नाही या विवंचनेत रहिवाशी वैतागले आहेत.नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
 
स्थानिक नगरसेवक लक्ष देत नाही,भारिप बहुजन महासंघाचे युवा तालुका अध्यक्ष नानाभाऊ सोनवणे यांनी वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करूसुद्धा काही उपयोग होत नसल्याने त्वरित घाण साफ न केल्यास भारिप बहुजन महासंघाच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
Powered By Sangraha 9.0