प्रकाशमान गावांचे ‘आयईए’तर्फे कौतूक

12 Nov 2018 18:57:50
 
 

जागतिक पातळीवर उज्वला, सौभाग्य योजनांच्या कामगिरीचा उल्लेख



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांशी योजनांपैकी एक असलेल्या सौभाग्य योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक खेड्यामध्ये विज पोहोचत आहे, उज्वला योजनेद्वारे देशातील प्रत्येक घरात स्वयंपाक गॅस जोडणीचे काम सुरू आहे. संपूर्ण जगाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब असल्याचे मत आंतरराष्ट्रीय उर्जा एजन्सीने (आयईए) व्यक्त केले आहे. स्वच्छ इंधनासाठी मोदी सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे भारतात प्रदुषणामुळे होणारे अकाली मृत्यूंचे प्रमाण घटल्याचेही आयईएने म्हटले आहे.

 

आयईए ही संस्था विविध देशांमध्ये होत असलेल्या उर्जा क्षेत्रातील बदलांवर नजर ठेवते. सरकारकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे भारतात खेडोपाड्यात वीज पोहोचली. शाळा, बॅंक, आरोग्य सुविधांचाही उल्लेख संस्थेच्या तज्ज्ञांनी केला आहे. गावातल्या प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचावी यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार असून प्रत्येक उद्योग, कंपन्या यांनाही वीज जोडणी दिली जाणार आहे. गतवर्षी ग्रामीण भागातील ३ कोटी घरांपैकी सुमारे १ कोटी ९० लाख घरांमध्ये वीज पोहोचली नव्हती. मात्र, वर्षभरात त्यापैकी ९५ टक्के घरांमध्ये वीज पोहोचली आहे. उत्तरप्रदेश, ओडिसा, राजस्थान, झारखंड आदी राज्यांचा यात सामावेश असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. वर्ल्ड एनर्जी आयुटलूक २०१८नुसार, विज जोडणीपासून वंचित असलेल्यांच्या संख्येत १ अब्जाने घट झाली आहे. भारतातील उज्वला आणि सौभाग्य योजनेच्या यशाचाही यात वाटा आहे. २०१८साली देशभरातील प्रत्येक खेड्यात विज जोडणी झाली. ग्रामीण भागात रॉकेल, मेणबत्त्या आणि इतर गोष्टींचा खर्चही कमी होत गेला.

 

उज्वला योजनेची व्याप्ती

 

आत्तापर्यंत पंतप्रधान उज्वला योजनेतून ५० लाख लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले आहे. २०२०पर्यंत आणखी ८० लाख गॅस जोडणी दिले जाणार आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0