भाजपच्या महिला ओबीसी जिल्हाध्यक्षपदी योगिता पाटील

    दिनांक  09-Oct-2018वसई : भाजपच्या महिला ओबीसी मोर्चाच्या वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षा म्हणून वासळईच्या योगिता देवानंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील या आयटी इंजिनिअर असून त्या अध्यापन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे एक उच्चविद्याविभूषित नेतृत्व महिलांच्या ओबीसी मोर्चाला मिळाल्याचे समाधान पक्षातर्फे व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या सूचनेनुसार ठाणे-पालघर विभागाचे अध्यक्ष हरिचंद्र भोईर आणि वसई-विरार जिल्हाध्यक्ष कैलास म्हात्रे यांच्या संयुक्त पत्रान्वये योगिता पाटील यांची ही नेमणूक करण्यात आली असून, पाटील यांना पक्षाची ध्येय-धोरणे तथा ओबीसी मोर्चामार्फत केले जाणारे संघटनात्मक कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/