सोडलेली गॅस सबसिडी पुन्हा मिळणार

09 Oct 2018 15:02:44

 

 

 
 
 
नवी दिल्ली : गॅस सबसिडी सोडलेल्या तसेच सबसिडीचा लाभ न घेतलेल्या ग्राहकांना आता पुन्हा एकदा सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर ‘गिव्ह इट’ मोहिमेअंतर्गत तेल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना सबसिडी नाकारण्याचा पर्याय द्यायला सुरुवात केली होती.
 

अनेकांनी ही सबसिडी नाकारली होती. आता मात्र ही सबसिडी परत मिळविण्यासाठी ग्राहकांना त्यांचे वार्षिक उत्पन्न हे १० लाखांपेक्षा कमी आहे हे कळवावे लागणार आहे. तसेच आपले बँक अकाऊंट डिटेल्स आणि आणि आधार डिटेल्सही द्यावे लागणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0