मुंबईत डेंग्यूचे 5 बळी

06 Oct 2018 12:27:11


 


मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने काढता पाय घेतला आहे. त्यातच ‘ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकरांचा ताप वाढला असून साथीचे आजार ही बळावले आहेत. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये शहर-उपनगरांत डेंग्यूचे पाच बळी गेले असून लेप्टोचा एक बळी गेल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लेप्टो आणि डेंग्यूमुळे तब्बल 12 बळी गेले होते. तसेच मुंबईत या वर्षीचा पहिला स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या रुग्णावर उपचार सुरू आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0