पुन्हा दहशतवाद्यांचा हल्ला; २ जण ठार

05 Oct 2018 16:12:24



श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला. श्रीनगरमधील करफल्ली परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारातमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे दोन कार्यकर्ते ठार झाले आहेत. एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे अजून स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत. यासंदर्भात ओमर अब्दुल्ला यांनी निषेध व्यक्त केला. तसंच मृत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 
 
 

८ ऑक्टोबरला काश्मीरमध्ये ग्राम पंचायत आणि काही नगरपालिकांच्या निवडणूक आहेत. यासाठीच नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते नाझीर अहमद भट आणि मुश्ताक अहमद वाणी प्रचार करत होते. अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि पलायन केले. नाझीर आणि मुश्ताक जागीच ठार झाले तर त्यांचा सहकारी शकील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
Powered By Sangraha 9.0