अनधिकृत होर्डिंग पडून ३ जणांचा मृत्यू

05 Oct 2018 17:01:49


 

 

पुणे: पुण्यातील शनिवार वाडा परिसरात एका रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये तीन जण ठार झाले असून ८ जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामधील ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अतिदक्षता विभागात हलवले आहे. या अपघातात ६ रिक्षा, १ चारचाकी आणि काही दुचाकींचे नुकसान झाले आहे.

 

आरटीओकडे जाणाऱ्या मार्गावरील शाहीर अमर शेख चौकात दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे प्रशासनानं हे होर्डिंग उतरवण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले होते. ते कापून काढत असताना हा अपघात झाला. होर्डिंग कोसळलं तेव्हा रस्त्यावर नेहमीप्रमाणे रहदारी सुरू होती. अचानक आदळलेल्या वजनदार होर्डिंगच्या दणक्यानं यातील काही रिक्षाचा चुराडा झाला. त्यामधील चालक व प्रवाशांना चांगलाच मार लागला आहे. भगवानराव धोत्रे (वय ४८), भीमराव कासार (वय ७०), शिवाजी देविदास परदेशी (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 


Powered By Sangraha 9.0