संगीतातील ‘देव’ हरपला, यशवंत देव यांचे निधन

30 Oct 2018 11:59:36

 


 
 
 
मुंबई : ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटे आजारामुळे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. उपचारासाठी यशवंत देव यांना दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना चिकुनगुनिया हा आजार झाला असल्याचे समोर आले. १० ऑक्टोबरपासून ते शुश्रुशा रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 

‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘जीवनात ही घडी’, ‘असेन मी नसेन मीही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही अजरामर आहेत. सिनेमांबरोबर अनेक नाटकांनाही त्यांनी संगीत दिले होते. यशवंत देव यांना संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0