धनंजय गावडेंविरोधात बलात्काराचा गुन्हा

    दिनांक  03-Oct-2018


 

 

वसई : वसई-विरार महानगरपालिकेतील नगरसेवक धनंजय गावडे यांच्याविरोधात तुळींज पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने तुळींज पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत चित्रफीत प्रसारित करणार असल्याची धमकी दिल्याचा आरोपही सदर महिलेने केला आहे.

 

धनंजय गावडेंवर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते फरार झालेले आहेत. यातच आता त्यांच्याविरोधात तुळींज पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 34 वर्षीय महिलेने याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली असून 2016 साली त्यांनी कार्यालयात बलात्कार केल्याचे आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. तसेच त्यावेळी त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत चित्रफीत प्रसारित करण्याची धमकीही दिल्याचे सदर महिलेने म्हटले आहे. दरम्यान, धनंजय गावडे यांच्यावर शस्त्रास्त्राचा धाक दाखवल्या प्रकरणी आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/