एमआयएम व भारिप बहुजन महासंघाच्या हातमिळवणीची घोषणा

    दिनांक  03-Oct-2018औरंगाबाद : मोदी सरकारमुळे वंचित, दलित आणि बहुजन पीडित आहेत. भाजपच्या काळात वंचित, बहुजनांवर सर्वात जास्त अन्याय झाला असल्याचे अ‍ॅड. असदुद्दीन ओेवेसी म्हणाले. दरम्यान, आगामी निवडणुकीत एमआयएम व भारिप बहुजन महासंघाने हातमिळवणीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांचे प्रमुख अ‍ॅड. असदुद्दीन ओेवेसी व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यातील पहिली संयुक्त सभा मंगळवारी औरंगाबाद येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

 

मोदी सरकारमुळे वंचित, दलित आणि बहुजन पीडित आहेत. भाजपच्या काळात वंचित, बहुजनांवर सर्वात जास्त अन्याय झाला आहे. अन्याय संपविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहाण्याची गरज आहे. आता वंचित, बहुजन दलितांचे एकीचे बळ दिसेल,” असे ओवेसी म्हणाले.

 

देशाला राज्यघटना संघ, भाजपने तसेच काँग्रेसने दिली नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. सत्ताधारी संविधान बचाव रॅली काढून केवळ देखावा करत आहे. मात्र, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजले नाहीत तर ते काय संविधानाचे रक्षण करतील?” असा सवाल उपस्थित करत असदुद्दीन ओेवेसी यांनी भाजपसह काँग्रेसवर हल्लाबोल केला.

 

रावसाहेब दानवेंचे शेतकऱ्यांबद्दलचे वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. पाच वर्षांसाठी सत्ता तुमच्या हातात दिली होती. पाच वर्षांनंतर तुमचे परवाना नुतनीकरण करायचे की नाही, हे आता आम्ही ठरविणार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी मालकासारखे वागू नये,” असे आंबेडकर म्हणाले.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/