आशिष देशमुख यांचा राजीनामा

03 Oct 2018 12:28:55


 

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून नाराज असणारे भाजपचे काटोल येथील आ. आशिष देशमुख यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव असून वडिलांप्रमाणेच ते काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता आहे. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आशिष देशमुख वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाकडे गेले.
 

सत्य बोलणे म्हणजे बंडखोरी असेल, तर मी बंडखोर आहे. मुख्यमंत्र्यांवरचा माझा विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच मी आमदारकीचा राजीनामा देईन,” असा आक्रमक पवित्रा आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी घेतला होता. राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनही केले होते. त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरू होती. अखेर आज गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्षांना पाठवला.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
Powered By Sangraha 9.0