फ्लिपकार्ट,अॅमेझॉनकडून १ लाख २० हजार नोकऱ्या

29 Oct 2018 15:12:21

 


 
 
 
नवी दिल्ली : फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन प्रतिस्पर्धी कंपन्यामध्ये लवकरच मेगाभरती होणार आहे. ऐन दिवाळीदरम्यान ग्राहकांच्या वाढत्या मागण्या वेळेवर पूर्ण करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांकडून तब्बल १ लाख २० हजार तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती या कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
 

ऑनलाईन वस्तूंच्या खरेदीत वाढ झाल्याने सुमारे २ लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज निर्माण झाली आहे. असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यंदा फ्लिपकार्टने नवीन ऑफर्स आणि डिलिव्हरी सेवेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. डिलिव्हरी बॉईजची संख्या वाढवण्यावर सध्या फ्लिपकार्टने भर देत आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक केल्यानंतर फ्लिपकार्टमध्ये मोठा बदल झाला आहे. फ्लिपकार्टने उचललेली ही पाऊले पाहून अॅमेझॉननेही ग्राहक सुविधेवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. या दोन बड्या कंपन्यांच्या स्पर्धेतून गरजूंना मात्र नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0