ना. गिरीश महाजनांनी केला दुष्काळी पीक पाहणी दौरा

27 Oct 2018 11:55:10

 
 
 
ना. गिरीश महाजनांनी केला दुष्काळी पीक पाहणी दौरा
 
जामनेर, २६ ऑक्टोबर
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवार, २५ रोजी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान तालुक्यातील दुष्काळसदृश भागातील पिकांची पाहाणी केली. मंत्री महाजनांच्या प्राथमिक स्वरूपाच्या दौर्‍यामध्ये त्यांनी तालुक्यातील वाडीकिल्ला, सोनारी, मालदाभाडी आणि वाडी या परिसरातील शेती पिकांची आस्थेवाईकपणे पाहणी केली.राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मंत्र्यांना किमान चार तालुक्यांचा दुष्काळी पाहणी दौर्‍याचे नियोजन देण्यात आले आहे.
 
 
त्याअंतर्गत आजचा दौरा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आला होता. या पीक पाहाणी दौर्‍यावेळी तहसीलदार नामदेव टिळेकर, विलास पाटील, भागवत पाटील, नवलसिंग पाटील, सज्जन पाटील, सरपंच रंगनाथ पाटील, रमेश पाटील, राजू पाटील, दीपक तायडे, विशाल महाजन, रवींद्र झाल्टे, गोपाळ बडगुजर, मोती घ्यार, दगडू पाटील, महिपत बेलदार, कृषीअधिकारी रमेश जाधव, रमेश जाधव, राजू अजमेरा, संजय दालवाला, मंडळ आधिकारी ए. डी. हिरे, स्नेहा वाडेकर, सुरेखा पाडळे, प्रमोद इंगळे, राजेश देवळे (सर्व तलाठी) आणि परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता.
मंत्री महाजनांनी अधिकारी-पदाधिकारी आणि शेतकर्‍यांसोबत शेता-शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहाणी केली आणि त्याचवेळी शेतकर्‍यांशी संवादही साधला. यंदा ऐनवेळी परतीच्या कमी पर्जन्यमानामुळे सिंचनाच्या शेतीक्षेत्रासह आगामी काळात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न, तसेच शेती उत्पन्नामधे घट येण्याची भीती निर्माण झाल्याचे बोलले जाते, अशावेळी मंत्री महाजनांच्या पाहणी दौर्‍यामुळे शासनाकडून काहीतरी नुकसान भरपाई मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांतर्फे व्यक्त होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0