वरवरा राव यांच्या नजरकैदेत वाढ

26 Oct 2018 13:33:07


 

हैद्राबाद : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले वरवरा राव यांची नजरकैद तीन आठवडयांनी वाढली आहे. हैदराबाद उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी करताना हा निर्णय दिला. त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे व पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

 

या प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. यामध्ये वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांचा समावेश होता. नक्षलवादी संघटनांच्या केंद्रीय समितीचा प्रमुख चंद्रशेखरशी राव यांचा संपर्क होता. या दोघांमध्ये ईमेलद्वारे संपर्क होत असल्याचा पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी संशय व्यक्त केला होता. यामुळे न्यायालयाने राव यांची नजरकैद तीन आठवडयांनी वाढली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0