२० हजार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी देणार

26 Oct 2018 13:34:44



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा


वर्धा : प्रत्येक गावात घरोघरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. १५ वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण पेयजल योजनांसाठी केंद्र शासनाने ८ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यातील २० हजार गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पिपरी मेघे व १३ गावे वाढीव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सावंगी मेघे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, दत्ता मेघे, सावंगी मेघे ग्रामपंचायत सरपंच सरिता दौड आदी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0