नीरव मोदीची २५५ कोटींची संपत्ती जप्त

25 Oct 2018 12:47:34

 

 
 
 
 
हाँगकाँग : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५५ कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. आजवर नीरव मोदीची एकूण ४७४४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. ईडीच्या मुंबई कार्यालयाच्या चौकशी एजन्सीकडून नीरव मोदीच्या संपत्तीच्या जप्तीबाबत तीन आदेश देण्यात आले होते.
 
या आदेशानुसार २१८ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यात हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, मिहिर भंसाळी, ए.पी.जेम्स आणि ज्वेलरी पार्क या कंपन्यांच्या मालमत्त्यांचाही समावेश आहे. गुजरातमधील सुरत येथील एका न्यायालयाने नीरव मोदीला करचोरीच्या प्रकरणात फरार घोषित केले होते. तसेच डीआरएने याप्रकरणी आयात सीमा शुल्कात केलेल्या कथित चोरीबद्दल नीरवच्या विरोधात खटला दाखल केला होता. सध्या पीएनबी बँक घोटाळा याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे प्रमुख आरोपी देश सोडून पळून गेले आहेत. त्यापैकी मेहुल चोक्सी हा एंटीगुआ आणि बरमुडा येथे असल्याची माहिती समोर आली होती.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0