‘डीजे’ बंद म्हणजे बंदच: न्यायालय

19 Oct 2018 15:43:00


 


मुंबई: महाराष्ट्र सरकारने डीजे आणि डॉल्बी सिस्टीम वापरण्यावर लावलेल्या बंदीचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव संपल्यानंतर हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बीवरील बंदी न्यायालयाने उठवावी अशी याचिका डीजे मालकांनी सादर कोर्टाकडे सादर केली होती. पण यावर बंदीला अंतिम स्थगिती द्यायला कोर्टाने नकार दर्शविला आहे.

 

पुढील दोन आठवड्यांमध्ये या प्रकरणाची सुनावणी पुन्हा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डीजे बंदी उठवण्यासाठी स्पष्ट नकार दिल्याने तूर्तास तरी राज्यातील डीजेचा आवाज बंद राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. डीजे सिस्टीम सुरू करताच त्याचा किमान आवाज ध्वनिप्रदूषणाची कमाल पातळी गाठत असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे, असा दावा याचिककर्ते असलेल्या पाला या संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला होता. त्यासाठी डीजे सिस्टिमची उपकरणे तयार करणाऱ्या परदेशी कंपन्याकडून आलेल्या अहवालाचा दाखला दिलाय.

 

राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे आपल्या दाव्यावर ठाम असून राज्य सरकार आपल्या प्रतिज्ञापत्रात ही गोष्ट सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी न्यायालयासमोर व्यक्त केलाय. हे प्रतिज्ञा पात्र सादर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने २ आठवड्यांची मुदत दिली. राज्याच्या दाव्यानुसार डॉल्बी सिस्टीम आणि डीजे संगीताच्या वेळी ७० टक्क्यांहून अधिक वेळा ध्वनिप्रदूषाची पातळी कमाल मर्यादेच्यावर असल्याचा दावा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0