ओम पुरींबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत का?

18 Oct 2018 16:52:00


 


दिवंगत अभिनेते ओम पुरी यांचा आज जन्मदिवस. अनेक चित्रपटांमधून आपली वेगळी छाप पडणारे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे एक ज्येष्ठ अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी पंजाबमधील अंबाला येथे झाला. त्यांचा सरस अभिनय आणि काम करण्याची ऊर्जा शेवटपर्यंत तशीच होती. त्यांच्या ४० वर्षाच्या कालखंडात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

 

त्यांच्या काही 'अशा' गोष्टी ज्या क्वचितच तुम्ही ऐकल्या असतील,

 

> जन्म तारखेची मजेशीर कहाणी:

 

 
 

ओम पुरी यांच्या घरी कोणालाच त्यांची जन्मतारीख नेमकी कोणती याबद्दल माहिती नव्हती. मात्र शाळेतील दाखल्यावर ९ मार्च १९५० अशी जन्मतारीख होती पण तीही खोटी. ओम पुरींनी १९५० सालचे कॅलेन्डरमध्ये शोधून त्यांनी आपली जन्मतारीख कुठली याचा शोध लावला.

 

> खडतर बालपण:

 

 
 

ओम पुरी हे अतिशय सामान्य घरातून आले होते. त्यांचे भाऊ हे कुली होते तर ओम पुरी पोट भरण्यासाठी एका चहाच्या टपरीवर काम करायचे.

 

> नसरुद्दीन शाह आणि ओम पुरी:

 

 

नसरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्या खास मैत्री होती. त्यांनी दोघांचीही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र अभिनयाचे शिक्षण घेतले होते. या जोडीने त्याकाळात अनेक अप्रतिम चित्रपट दिले आहेत. 'अर्धसत्य', 'आक्रोश', 'जाने भी दो यारो' हे त्यापैकीच एक.

 

> मराठीतून चित्रपट सृष्टीत पदार्पण:

 

 
 

हो, ओम पुरी यांनी मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी विजय तेंडुलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' या चित्रपटात आपल्या अभिनयाला सुरुवात केली. हा चित्रपट 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे सिनेमा रूपांतर होते.

> 'अगणित' भाषेतून कामे:

 

 
 

त्यांनी हिंदी, मराठीसोबतच अनेक भाषांमधून कामे केली. त्यांनी इंग्रजी, पंजाबी, कन्नड, तेलगू आणि मल्याळम अशा भाषांमध्ये कामे केली. 'गांधी' आणि 'सिटी ऑफ जॉय' या इंग्रजी चित्रपटामधील त्यांचा अभिनय आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावाजला गेला.

 

> अपुरी स्वप्न:

 

 
 

त्यांची अनेक स्वप्न होती. त्यांची दोन स्वप्ने होती. एक म्हणजे त्यांचा शेती आणि कुकिंग या दोन्ही विषयांमध्ये खास रस होता. त्यांना 'डाल रोटी' या नावाने एक ढाबा उघडायचा होता. नंदिता दास यांनी सांगितल्यानुसार त्यांचे दुसरे स्वप्न होते ते म्हणजे खंडाळ्यामधे अभिनयाचे गुरुकुल चालू करायचे होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0