हेरगिरीप्रकरणी जवानाला अटक

17 Oct 2018 14:50:29

 

 

 
 
मिरत : उत्तर प्रदेशातील सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाला हेरगिरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मिरत कॉन्टिमेंट परिसरातून त्याला अटक करण्यात आली. या जवानाची सध्या चौकशी केली जात असून त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. गोपनीय माहिती फोडल्याचा त्याच्यावर आरोप असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली.
 

या जवानाने केलेल्या या दृष्कृत्यात लष्करातील इतर काही लोकांचा समावेश आहे का? हे याचा तपास सुरू आहे. याआधी नागपूर येथील ब्राम्होस युनिटमधून एअरोस्पेसचा अभियंता निशांत अग्रवाल याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रच्या एटीएस पथकाने संयुक्तपणे याप्रकरणी कारवाई केली होती. चौकशीसाठी त्याला लखनऊला नेण्यात आले होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचा आरोप निशांतवर आहे. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0