जि.प.चे वरिष्ठ अधिकारी, तक्रारदारात फ्री-स्टाईलमेव्हणीला अमृत योजनेचा आहार न दिल्याने बदलला वितरण ठेका

16 Oct 2018 11:22:31


जि.प.चे वरिष्ठ अधिकारी, तक्रारदारात फ्री-स्टाईल
मेव्हणीला अमृत योजनेचा आहार न दिल्याने बदलला वितरण ठेका

जळगाव, 15 ऑक्टोबर
 जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहाराचा ठेका रावेर तालुक्यातील अभोडा येथील कादर तडवी यांना देण्यात आला आहे. मात्र महिला बालकल्याण विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांच्या मेव्हणीच्या देराणीला अमृत योजनेचा लाभ न मिळाल्याने सदर ठेका त्यांच्याकहून काढून घेण्यात आला. सदर पोषण आहाराबाबतची वितरण ठेका त्यांच्याकडून काढून का?घेण्यात आली याबाबत विचारणा करणार्‍या तक्रारदारला महिला बालकल्याण विभागाचा संबंधित अधिकारी व तक्रारदार याच्यात चंागलीच फ्रिस्टाईल झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत दिवसभर रंगत होती.

तक्रारदाराला अपाल्या कक्षात या अधिकार्‍याने मारहाण केल्याचे समजते. तक्रारदाराने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना भेटून त्यांनी
मारहाणीबाबत जिल्हा परिेषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तोंडी स्वरुपात कैफियत मांडली आहे. महिला व बालकल्याणच्या या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून नातेवाईकाला सदर पोषण आहाराचा वितरणचा ठेका देण्यात आल्याचे समजते. जिल्हा परिेषदेत घडलेल्या य घडामोडीची दिवसभर चर्चा रंगली होती. याबाबत मात्र इतर अधिकार्‍यांना विचारणा केली असता, त्यांनी चुप्पी साधली. जिल्हा परिषदेत पोषण आहाराबाबत वारंवार तक्रारीचा पाढा वाचला जातो. मात्र त्यानिमित्ताने पोषण आहाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्हा परिषदेचया विविध बैठकामध्ये पोषण आहाराचा मुद्दा नेहमीच मांडला जातो. त्याबाबतच्या तक्रारीची संख्या मोठी आहे. मात्र सोमवारी मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेत झालेल्या प्रकाराने सगळेच अचंबित झाले आहेत. या घटनेबाबत रात्री उशीरपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
मिनी मंत्रालयातून
जनतेने काय आदर्श घ्यावा?
जिल्ह्यातील अडचणी समस्या घेवून नागरिक मिनी मंत्रालयात येतात. मात्र सोमवारी झालेल्या घटनेने जनतेने काय आदर्श घ्यावा, असा प्रश्‍न सगळ्यांनाच पडला आहे.

Powered By Sangraha 9.0