अमेरिकेच्या इराणवरील प्रतिबंधांमुळेच इंधनाच्या किंमतीत वाढ : धर्मेंद्र प्रधान

16 Oct 2018 19:34:30
 
 

नवी दिल्ली : इराणवर नोव्हेंबरमध्ये लागू होणाऱ्या निर्बंधांमुळेच इंधनदरवाढीची भीती असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. इराणवरील निर्बंधांमुळे कच्च्या तेलाचा मोठा पुरवठादार गमावण्याची शक्यता असून त्यामुळे तेलाच्या किमती आणखी वाढणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी इंडीया एनर्जी फोरमच्या माध्यामातून प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, पहिल्या दिवसांपासून आम्ही हेच अधोरेखित करत आहोत, कि कच्च्या तेलाची उपलब्धता ही समस्या नसून जगभरातील पुरवठा करणाऱ्या देशांकडे निर्यात करण्याइतपत कच्चे तेल उपलब्ध आहे. या महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल ८६.७४ रुपयांवर पोहोचल्या होत्या. गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक स्तर होता. यावर उपाययोजना म्हणून तेल निर्यातदार देशांचा समुह ओपेकने तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. यामुळे तेलाचे निर्यातदार आणि आयातदार यांना फायदा होईल.

 

इंधन आयातीत भारत तिसरा मोठा देश

इंधन आयात करण्यामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. देशात ८० टक्के कच्चे तेल आयात केले जाते त्यापैकी १० टक्के पुरवठा इराणकडून केला जातो. इराणवर लावलेल्या निर्बंधांमुळे येत्या काळात तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
 
Powered By Sangraha 9.0