राष्ट्र सेविका समितीचे पुणे महानगरात संचलन संपन्न

15 Oct 2018 09:24:38



पुणे : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राष्ट्र सेविका समिती, पुणे महानगराचे विजयादशमी निमित्तचे पथसंचालन कर्वेनगर परिसरात आयोजित करण्यात आले होते. संचलनासाठी पुणे महानगरातील शेकडो सेविका या उपस्थित होत्या.

कर्वेनगर येथील मोरया कृपा सोसायटीच्या मैदानात आज सकाळी ८ वाजता या सघोष संचलनाला सुरुवात झाली होती. संचलनासाठी ८०० सेविका उपस्थित होत्या तर संपूर्ण गणवेशात ६२५ सेविकांनी संचलन केले. तालबद्ध घोषासह निघालेले पथसंचलन, घोषगण तसेच अश्वरूढ ध्वज या सर्वांनीच आसपासच्या परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांनी देखील संचलनाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

पथ संचलनाची सुरुवात शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमाने झाली. राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदाताई जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाहिका पुनमजी शर्मा, पुणे महानगर कार्यवाहिका मीनाताई कानडे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी समितीचे अधिकारी वर्ग, परिसरातील नगरसेवक, नगरसेविका देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. परिसरातील स्थानिक गणेश मंडळे व लोकप्रतिनिधी यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले होते. समितीकडून यावेळी त्यांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले
Powered By Sangraha 9.0