अल्पना कला स्पर्धा-२०१८ अंतर्गत आज‘तरुण भारत’तर्फे भडगावला रांगोळी स्पर्धा

15 Oct 2018 13:13:21
 
 
अल्पना कला स्पर्धा-२०१८ अंतर्गत आज
‘तरुण भारत’तर्फे भडगावला रांगोळी स्पर्धा

भडगाव, १४ ऑक्टोबर
‘जळगाव तरुण भारत’ने नवरात्रोत्सवानिमित्त भडगाव येथे सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ६.३० दरम्यान सर्वांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा संतसेना महाराज विठ्ठल रुख्मिणी मंदिर, नाचणखेडा रोड, भडगाव येथे होणार असून त्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
स्पर्धा संपल्यानंतर परीक्षक परीक्षण करतील आणि नंतर त्याच स्थळी सायंकाळी ७ वाजता बक्षीस समारंभ होईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी - रेणुका जनरल स्टोअर्स बस स्टॅन्ड, सुरेश एम्पोरियम, वर्धमान मेडिकलच्या बाजूला, अक्षरा स्टेशनरी ऍण्ड जनरल स्टोअर्स व्यंकटेश प्लाझा, मनोज पाटील मो ९९७००७४६१४ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धकांसाठी महत्त्वाचे
सर्व स्पर्धकांनी रांगोळी स्वतः आणावी. रांगोळी काढण्यासाठी ४ बाय ४ आकाराची जागा आखून देण्यात येईल. त्यातच रांगोळी काढावी लागेल.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक, प्रायोजक तथा संयोजकांनी केले आहे.
विशेष सहकार्य
या स्पर्धेसाठी डॉ.संजीव पाटील युवा प्रतिष्ठान, पाचोरा-भडगाव यांचे सहकार्य लाभत आहे.
 
आकर्षक बक्षिसे
स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रू.१००१/, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला रू.७०१/, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला रू.५०१/-, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर २ उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रू. २०१/- आणि त्यापुढील ५ रांगोळ्यांना प्रत्येकी १०१/- रू. अशी एकूण १० बक्षिसे आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0