एसबीआयच्या खात्याशी मोबाईल क्रमांक जोडा, अन्यथा...

15 Oct 2018 13:40:29



नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोबाइल क्रमांक जोडणी बंधनकारक केली आहे. नेट बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांना एसबीआयने या सूचना दिल्या आहेत. डिसेंबर २०१८ पूर्वी नेट बँकिंगच्या वापरकर्त्यांची बँकेत जाऊन आपला मोबाईल क्रमांक जोडावा अशी सूचना दिली आहे. जर मोबाईल क्रमांक तुमच्या खात्याशी जोडला नाही तर तुम्हाला नेट बँकिंगचा वापर करता येणार नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

 

जुलै २०१७ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या एका पत्रकानुसार, देशातील बँकांनी ग्राहकांना एसएमएस आणि -मेल अलर्ट मिळण्यासाठी मोबाइल क्रमांक रजिस्टर करायला सांगावा असा आदेश देण्यात आला होता. त्यासनुसार एसबीआयने आपल्या ग्राहकांना या सूचना केल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0