मनोहर पर्रिकर गोव्यात परतले

14 Oct 2018 22:42:38


 

नवी दिल्ली/पणजी: गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था रुग्णालयात (एम्स) स्वादुपिंडाशी संबंधित आजारावर उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे रविवारी गोव्यात परतले. एम्समधून त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर विशेष विमानाने त्यांना गोव्यामध्ये आणण्यात आलेदि.१५ सप्टेंबरपासून मनोहर पर्रिकर हे एम्समध्ये उपचार घेत होते.
 

एम्समधील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी सकाळी त्यांची प्रकृती काहीशी खालावली. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात काहीवेळ ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारच्या सुमारास त्यांना नवी दिल्ली येथून ‘एअर अॅम्ब्युलन्स’ने गोव्याची राजधानी पणजी येथे आणण्यात आले. नुकतीच मनोहर पर्रिकर यांनी रुग्णालयात असतानाही गोवा राज्य सरकारमधील मंत्री व नेत्यांची बैठक घेतली होती व गोव्यातील कामकाजाचा आढावा घेतला होता. आता गोव्यात परतलेले पर्रिकर हे शासकीय निवासस्थानी राहणार नसून आपल्या खासगी रुग्णालयातच राहणार असल्याचे समजते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0