धक्कादायक; अलिगढ विद्यापीठात मन्नान बशीर वानीची शोकसभा

12 Oct 2018 12:53:36



अलिगढ : हंदवाडा येथे लष्कराने खात्मा केलेला दहशदवादी मन्नान बशीर वानीची अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शोकसभा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी विद्यापीठाने तीन काश्मीरी विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित केले आहे. तर अन्य चार जणांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. मन्नान वानी हा मुस्लिम एएमयूचा विद्यार्थी होता.

 

मन्नान वानी याचा मृत्यू झाल्याची बातमी मिळताच विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी त्याला शाहिद घोषित केले. तसेच सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाच्या परिसरात १५० विद्यार्थ्यांनी मिळून त्याच्या मृत्यूची शोकसभा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित अन्य विद्यार्थांनी त्यांना विरोध केला. यात दोन्ही गटात बाचाबाची झाली. या प्रकरणावरून विद्यापीठ प्रशासनाने कडक पाऊले उचलत जणांना विद्यापीठातून बडतर्फ केले असून अन्य जणांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

 

मन्नान बशीर वानी हाहिजबुल मुजाहिद्दीया संघटनेचा कुपवाडाचा कमांडर होता. मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी होता. त्याने पीएचडीची वाट सोडून दहशतवादी संघटनेचा रस्ता पकडला. मन्नान दहशतवादी संघटनेत सामील झाल्यानंतर विद्यापीठातून त्याला काढून टाकण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0