१०८वरची रुग्णवाहिकेला आजपासून ब्रेक

12 Oct 2018 13:40:36



मुंबई: राज्यातील आपत्कालीन सेवा म्हणून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ओळखली जाते. अपघाताची माहिती मिळताच या क्रमांकावर फोन केल्यास आपल्याला रुग्णवाहिकेची सेवा पुरवली जाते. आता मात्र या रुग्णवाहिकेला विराम मिळण्याची चिन्ह आहेत. या रुग्नवाहिकेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या विरुद्ध रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केलीये.

 

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची संपूर्ण जबाबदारी हि भारत विकास ग्रुपवर सोपवण्यात आले आहे. पण ही जबाबदारी सांभाळणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या विरोधात रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केलीये. ही कंपनी मनमानी करत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनचे अध्यक्ष समीर करबेले यांनी केला. त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी आणि डाॅक्टर या संपात सहभागी आहेत.

 

वेतनवाढ, वेतन करार, ड्रायव्हर आणि डॉक्टरांची होणारी पिळवणूक, अधिकचे ड्युटीचे तास अशा विविध मागण्यांसाठी हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत औद्योगिक न्यायालय, आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, पोलीस अधीक्षक, सर्व महापालिका आयुक्त यांना २८ सप्टेंबरला पत्र पाठवून कळवल्याचे समीर करबेले यांनी सांगितलंय.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0