नीरव मोदीची ६३७ कोटींची संपत्ती जप्त

01 Oct 2018 13:02:24
 

नवी दिल्ली : सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) पंजाब नॅशनल बॅंकेला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीला दणका दिला आहे. नीरव मोदीची ज्वेलरी, बँक खाती आदींसह सुमारे ६३७ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने पाच देशांत जाऊन ही कारवाई केली. त्याच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत २२.६९ कोटीच्या हिरेजडीत दागिन्यांचाही समावेश आहे.

 

हाँगकाँगमध्ये त्याची ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे तर मुंबईतील त्याचा १९.५ कोटींचा प्लॅटही जप्त केला आहे. हा फ्लॅट पूर्वी नीरव मोदी याच्या नावाने नोंदणीकृत होता. २०१७ मध्ये तो खरेदी करण्यात आला होता. ईडीने त्याचे सिंगापूरचे एक बँक खाते गोठवले आहे. त्यात ४४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. आइसलँड कंपनीच्या नावाने हे खाते उघडण्यात आले होते. या बँक खात्याच्या खातेधारकांमध्ये पूर्वी मोदी आणि मयंक मेहता यांच्या नावाचा उल्लेख आल्याचे सूत्रांनी सांगितल. याशिवाय नीरव आणि पूर्वी मोदी यांच्या नावाने असलेले पाच बँक खातेही गोठवण्यात आले आहेत. त्यात २७८ कोटींची संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची लंडनमधील ५६ कोटींची संपत्तीही जप्त केली आहे. लंडनमधील त्याचा एक फ्लॅट सुद्धा जप्त करण्यात आला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील २१६ कोटी किंमत असलेल्या त्याच्या दोन मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0