नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरण हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अयशस्वी झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. आज राज्यसभेत शून्य प्रहरात महाराष्ट्रात घडलेल्या घटनेवर चर्चा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
आज सकाळी उपसभापती वैंकय्या नायडू यांनी शून्य प्रहरात भीमा कोरेगाव दंगलीवर खेद व्यक्त करत सर्व सदस्यांना आपले मत शांतपणे मांडण्याची विनंती करून चर्चेला सुरूवात केली. यामध्ये रजनी पाटील, शरद पवार, कनिमोझी यांसह अनेक खासदारांनी आपली मते यावेळी मांडली.
शदर पवार या चर्चेत बोलताना म्हणाले की, १ जानेवारीला महाराष्ट्रातील भीमा कोरेगावमध्ये जे झालं त्याच्यामुळे संपूर्ण देशाला ठेच पोहोचली आहे. मी स्वत: गेली पंचवीस वर्ष या विजय दिवसच्या कार्यक्रमाबद्दल ऐकत आहे मात्र, गेल्या २५ वर्षांमध्ये एकदाही अशी दुर्दैवी घटना घडल्याचे माझ्या पाहाण्यात नाही असे त्यांनी यावेळी म्हणले.
विजय दिवसाच्या दिवशी भीमा-कोरेगाव आणि आसपासच्या गावामध्ये ज्या गटना घडल्या अश्याचप्रकारचा प्रसंग काही दिवसआधी संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वडू या गावातही झाला होता. मात्र या घटनांकडे सरकारने लक्ष दिले नाही आणि त्यांचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रानी पाहिले आहेत असे ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातील सद्यस्थिती लक्षात घेऊन सरकार आणि आंबेडकरवादी संघटनांनी राज्यात शांतंता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.