IPL 2018 : धोनी अखेर दिसणार चेन्नईच्या 'जर्सी'त, गंभीरला 'केकेआर'ने वगळले

04 Jan 2018 19:49:43


यंदा ४ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान 'आयपीएल २०१८'चे रंगणार रंगणार आहेत. त्यासाठी प्रत्येक संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आज जाहीर करणे अपेक्षीत होते, त्याप्रमाणे आज प्रत्येक संघाने आपले खेळाडू जाहीर केले आहेत. यामध्ये महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा 'चेन्नई सुपर किंग्स'ची जर्सी घालून मैदानात उतरणार असल्याचे दिसून येत आहेत. तर दुसरीकडे शाहरुख खानच्या 'केकेआर'ने कप्तान गौतम गंभीरला कायम खेळाडूंच्या यादीतून चक्क वगळल्याचे समोर आले आहे.
मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा 'हिटमॅन'वर विश्वास ठेवत रोहित शर्मा सह हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराहला आपल्या संघात कायम ठेवले आहे. मागील वर्षी पुण्याचा कप्तान असलेल्या. स्टीव स्मिथला राजस्थान रॉयल्सच्या संघाने घेतले आहे. २७ व २८ जानेवारी रोजी इतर खेळाडूंसाठी आयपीएलची बोली लागणार आहे.

प्रत्येक संघाने कायम ठेवलेले खेळाडू व संघ खालीलप्रमाणे
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0