जम्मू काश्मीर सहीत दिल्लीत भूकंपाचे तीव्र झटके

31 Jan 2018 12:48:07

 प्रतीकात्मक फोटो 
 
 
जम्मू आणि काश्मीर सहित दिल्लीत भूकंपाचे तीव्र झटके आज दुपारी नागरिकांना जाणवले आहेत. लोक आपापल्या घरातून बाहेर पडू लागल्याचे वृत्त नुकतेच हाती लागले आहे. नवी दिल्लीत अनेकांनी घराच्या बाहेर धाव घेतली, तर जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे देखील नागरिकांनी घराबाहेर त्वरित धाव घेतली आहे.
 
 
 
केवळ जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात हे झटके जाणवले आहेत. पंजाबमधील चंदिगढ येथे देखील यामुळे एकाच धांदल उडाली, त्याचबरोबर उत्तरप्रदेशातील नोएडा येथे देखील यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे जीवितहानी झाल्याचे कुठलेही वृत्त अद्याप आलेले नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0