जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटीबद्ध

    दिनांक  03-Jan-2018

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचे प्रतिपादन

 

 
 
पालघर : कुपोषणमुक्त पालघर, पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे, वनहक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीवर भर, तसेच जिल्ह्याच्या इतर कामांना गती देण्याचा संकल्पकरुन जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ’सिध्दी २०१७- संकल्प २०१८’ या उपक्रमांतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. नारनवरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी एन. के. जेजूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे व विविध विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.
 
 

 
 
यावेळी बोलताना डॉ. नारनवरे म्हणाले की, ''गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यास प्रशासनास यश आले आहे. पालघर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी शासनामार्फत विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या निधीचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींचा पेसा अंतर्गत समावेश करण्याचा प्रयत्न आहे. वनहक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी गावनिहाय कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांच्या सबलीकरणासाठी गट शेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे.'' पालघर जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असलेले विविध कार्यालये सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.