जनतेच्या समस्या जाणणारे सरकार राज्याला हवे' : अजित पवार

    दिनांक  21-Jan-2018नांदेड : ' राज्यातील सामान्य नागरिकापासून ते विद्यार्थीम शेतकऱ्यांपर्यंत सर्वच जनता या सरकारच्या कारभाराला वैतागलेली आहे, त्यामुळे सामान्य जनतेची समस्या जाणणारे सरकार राज्याला हवे, तरच राज्यातील जनतेचा विकास होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज केले आहे. नांदेड येथील उमरी येथे हल्लाबोल यात्रेला संबोधित करताना ते बोलत होते.

'मोदी करिष्म्यामुळे राज्यात आणि केंद्रात भाजप पक्ष सत्तेवर आला. परंतु केंद्राबरोबर राज्यात देखील हे सरकार जनतेची कामे करण्यामध्ये पूर्णपणे फोल ठरले. यांच्या बोगस आणि भोंगळ कारभाराने जनता आणि शेतकरी वैतागलेले असतानाच, रक्त आणि घाम गळून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. परंतु सरकारने याकडे देखील नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. अगोदर पिकांना हमीभाव मिळत नव्हता त्यात आता सर्वच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे, पण तरी देखील या सरकारला जाग येत नाही' अशी टीका पवार यांनी यावेळी केली.या सरकारचा पायगुणच वाईट

'भाजप सरकार सत्तेमध्ये आपल्यापासून गेल्या तीन वर्षांमध्ये राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवर अनेक अडचणी आल्या आहेत. कारण या सरकारचा पायगुण राज्यातील जनतेसाठी वाईट आहे' असा टोला ही त्यांनी यावेळी राज्य सरकारला लगावला.