अंध क्रिकेट विश्वचषकात भारताची बाजी

20 Jan 2018 20:36:03

 
अंध क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यात बाजी मारून भारतीय संघाने विश्वचषक आपल्या नावे केला आहे. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी संघाला २ गडी राखून पराभूत केले आहे. पाकिस्तानने ३०९ धावांचे लक्ष्य समोर ठेवले होते. हे लक्ष्य गाठताना भारतीय संघाने ३०९ धावा करून २ गाडी राखले आणि विश्वचषकात बाजी मारली.
 
 
यु.ए.ई. येथील शारजाह येथे सुरु असलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय अंध क्रिकेट संघातील सुनील रमेशने ९३ धावा तर कर्णधार अजय रेड्डीने ६३ धावा बनवून भारताची बाजू भक्कम केली. भारताच्या बाजूने सामना येत असताना पाकिस्तानने भारताचे सलग तीन गाडी बाद केले. त्यामुळे हाती आलेला सामना जातो की काय! अशी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र नवीन आलेल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे पुन्हा एकदा सामन्यावर जोर बसला.
 
 
याबद्दल सर्वस्तरातून भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी ट्वीटद्वारे अभिनंदन करत तुम्ही भारतासाठी अभिमान आणि प्रेरणादायी आहात असे म्हटले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0