केळवे बीच पर्यटन महोत्सव २०१८ चे आयोजन

    दिनांक  02-Jan-2018
 
 
 
 
 
पालघर : केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाने 'केळवे बीच पर्यटन महोत्सव २०१८' चे आयोजन केले आहे. हा महोत्सव शनिवार व रविवार दि. १३ व १४ जानेवारी रोजी आदर्श विद्यामंदिर पटांगण, केळवे रेथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे.
 
 
केळवे पर्यटन महोत्सवाचे आयोजन रोजगार निर्मिती, महिला बचतगट, विविध परंपरा, विविध जाती-धर्मातील खाद्य संस्कृतींचा प्रचार करण्यासाठी केले आहे. केळवे गावात पर्यटन व्यवसाय व पर्यटकांची संख्या वाढावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास व पालकमंत्री विष्णू सवरा हे असून उद्घाटक खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा हे असतील. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कोकण पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष माधव भांडारी व आ. मनीषा चौधरी उपस्थित राहणार आहेत.