जिल्ह्यातील २० शाळांना मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जा

02 Jan 2018 13:37:00
 
 
 
 
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती करण्यात येणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांचाही समावेश करण्यात येणार आहे. राज्य सरकारने राज्यभरात १० ‘ओजस’ आणि ९० ‘तेजस’ शाळा निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही आंतराराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.
 
 
नाशिक जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी सहा शाळांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाकडून या शाळांना मार्गदर्शन मिळणार आहे.
 
 
नाशिक जिल्ह्यातीन दोन 'ओजस' शाळा अन्य १८ शाळांनाही आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत करणार असल्याने जिल्ह्यात एकूण २० शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थी पटसंख्या प्रत्येकी दोन तुकड्यांसाठी पहिली ते पाचवीसाठी ३००, सहावी ते आठवीसाठी २१०, नववी ते दहावीसाठी १६० विद्यार्थी अपेक्षित असून, किमान एक हजार पटसंख्या सामावण्याची क्षमता आवश्यक असते.
 
 
Powered By Sangraha 9.0