खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची नुसती घोषणाच झाली - राष्ट्रवादीचा हल्लाबोल

    दिनांक  19-Jan-2018

 
निलंगा (लातूर) : १५ डिसेंबर पर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची नुसती घोषणाच झाली खड्डे मात्र तसेच आहेत, असा आरोप करत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलंगा-उदगीर रस्त्यावर खड्डयासोबत सेल्फी काढला.
 
राष्ट्रवादी पक्षाची हल्लाबोल यात्रा सध्या मराठवाड्यात सुरु आहे. त्या यात्रेदरम्यान सर्वत्र खड्डेच खड्डे आढळुन आले. निलंगा-उदगीर दरम्यान स्वतः अजितदादांनीच, धनंजय काढ रे जरा खड्डयांचे सेल्फी अन दे चंद्रकातदादांना पाठवून असे सांगितले, अशा आशयाचे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
 
धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बडेमिया तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छोटे मिया असे संबोधत म्हटले की, शेतकरी आणि जनतेची फसवणूक करण्यात बडे मियाँ (मोदी) तो बडे मियाँ , छोटे मियाँ (देवेंद्र फडणवीस) भी कुछ कम नही है, एकाने देशाला आणि एकाने राज्याला फसवण्याचे काम केले आहे.