'अशा' नेत्यांना बाजूला ठेवून एकत्र या : आठवले

    दिनांक  14-Jan-2018
औरंगाबाद : 'प्रकाश आंबेडकरांना जर ऐक्याची भाषा मान्य नसेल तर आंबेडकरवादी जनतेनी स्वतः ऐक्याविषयी विचार केला पाहिजे व ऐक्याला विरोध करणाऱ्या अशा नेत्यांना बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे' असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज केले आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर जर माझ्यावर टीका करत असतील तर त्यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणून दाखवावा आणि ज्यांना निवडणून आणले आहे त्यांना पुढे आणा, असा टोला आठवले यांनी यावेळी लगावला. तसेच हे आंबेडकरी जनतेच्या ऐक्याला विरोध करणाऱ्या अशा नेत्यांविषयी स्वतः जनतेनीच विचार करावा आणि त्यांना बाजूला ठेवून एकत्र यावे' असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लोकसभेत भाजप-शिवसेना एकत्र येणार नाही
भाजप आणि शिवसेनेमध्ये जे काही होते, ते सर्व आता आटलेले आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकींना हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार नाही. आमचा पक्ष मात्र अद्याप ही दोन्ही पक्षांमध्ये समजूत घालण्याच्या भूमिकेतच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये जो काही निर्णय होईल, त्याप्रमाणे आम्ही देखील आपली भूमिका मांडू,' असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.