स्थलांतरित कामगारांना सेकण्ड क्लास नागरिक म्हणून वागवणे चुकीचे - राहुल गांधी

14 Jan 2018 16:07:14

 
स्थलांतरित भारतीय कामगारांना केंद्र सरकारतर्फे स्थलांतरित नागरिक म्हणून वागणूक दिली जात आहे, जी अत्यंत निंदनीय आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की. ही भेदभावयुक्त वागणूक भाजपची मानसिकता दर्शवते.
 
 
 
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे स्थलांतरित भारतीय कामगारांना केसरी रंगाचे आणि इतर भारतीयांना निळ्या रंगाचे पासपोर्ट दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. स्थलांतरित भारतीय कामगार पासपोर्टच्या इ.सी.आर. प्रकारात मोडतात. इतर देशांत कामगार म्हणून जाणारे हे भारतीय नागरिक १० पेक्षा अधिक शिक्षित नसतात. या सर्वांना वेगळ्या रंगाचे पासपोर्ट देऊन कामगारांप्रती केंद्र सरकार भेदाभाव करत आहे, असे राहुल गांधी यांना वाटत आहे.
 
 
यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे स्पष्टीकरण दिले गेले आहे. पासपोर्टच्या शेवटी चापले जाणारे माहितीचे पृष्ठ देखील छापले जाणार नाही, असे देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डायन संघटनेच्या नियमावली नुसार हे बदल केले गेल्याचे सांगितले गेले.
 
 
Powered By Sangraha 9.0