पालघर येथील समुद्रात नाव उलटली, ७ ते ८ मुलं बेपत्ता

    दिनांक  13-Jan-2018
 
 
 
 
 
पालघर: पालघर येथील समुद्रात आज सकाळी नाव उलटली असल्याची घटना घडली आहे. या नावेमध्ये ४० मुलं असल्याची माहिती सध्या मिळत आहे. ३२ मुलांना यात वाचवण्यात आले असून मात्र ७ ते ८ मूलं यात बेपत्ता झाले आहेत. सध्या बचाव पथक या मुलांचा तपास करीत आहेत. बेपत्ता मुलांची ओळख जाणून त्यांच्या घरच्यांशी संपर्क केला जात आहे.
 
 
 


शाळेच्या सहलीसाठी हे ४० मुलं याठिकाणी आले होते. मात्र समुद्रात काही अंतरावर गेल्यावर अचानक नाव उलटली. ही नाव कशी उलटली अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र या घटनेत बेपत्ता झालेल्या ७ ते ८ मुलांचा शोध घेतल्या जात आहे. नाव उलटताच आजूबाजूच्या बोटींनी या नावेकडे धाव घेतली आणि ३२ मुलांना वाचवले मात्र ज्या मुलांना पोहता येत नव्हते त्या मुलांचा शोध सध्या घेतला जात आहे.
 
 
पालघरमधील के. एल. पोंडा हायस्कूलमधील ही मुले होती असे सांगण्यात येत आहे. या हायस्कूलची सहल काढण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने या मुलांसोबत हा प्रसंग घडून आला असल्याचे सांगितले जात आहे.