पंकजा मुडे यांचा सावरगाव येथे दसरा मेळावा, भाषणाकडे लक्ष

    दिनांक  30-Sep-2017


बीड : भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत करून यावर्षी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याला नव्या जागी सुरूवात केली आहे. यंदाचा दसरा मेळावा भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या तसेच भगवानगडापासून ५० किमी अंतरावर असलेल्या सावरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

नामदेव शास्त्रींचा विरोध

दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांचे गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र गडावर राजकीय भाषण करण्यास शास्त्रींचा विरोध असून त्यांनी तो अद्याप कायम ठेवला आहे.

 Embeded Object


कर्मभूमी नाही तर जन्मभूमी बोलावतेय, जन्मस्थळाची माती कपाळी लावून नवीन अध्याय सुरू करते असे पंकजा मुंडे यांनी व्टिटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

Embeded Object

काय आहे प्रकऱण ?

मागील वर्षीही भगवानगडावरून पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रीं यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला होता. भगवानगडावर १९५८ पासून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. १९९७ पासूनचे सर्व मेळावे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत झाले होते. त्याममुळे गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे असे समीकरण गेले अनेक वर्षे सुरू होते. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन वर्षे मेळावा सुरू ठेवला. मात्र आता दसरा मेळावा होऊ देणार नाही अशी भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतल्यामुळे या वादाला तोंड फुटले होते.