तांडा वस्ती सुधार योजना, २९ सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव स्वीकारणार

    दिनांक  28-Sep-2017

जिल्हास्तरीय समितीवर अशासकीय अध्यक्ष व सदस्य यांची नेमणुक

परभणी : भटक्या विमुक्त जाती/जमाती वस्तीतील पायाभुत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी राज्यात वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीवर अशासकीय अध्यक्ष व सदस्य यांची नेमणुक करण्यासाठी लोक प्रतिनिधीकडून प्रस्ताव मागविण्याबाबत संचालक विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्देश दिलेले आहेत. त्या अन्वये जिल्हयातील लोकप्रतिनिधी यांनी आपले प्रस्ताव विहीत नमुन्यात दिनांक २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जायकवाडी वसाहत कारेगांव रोड, परभणी येथे तीन प्रतीमध्ये सादर करण्यात यावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांनी केले आहे.