अंत्योदय अभियानाचा सर्वांगीण ग्रामविकासासाठी उपयोग करावा : जिल्हाधिकारी पी.शिवशंकर

    दिनांक  28-Sep-2017

 

परभणी : ग्राम विकास विभागामार्फत येत्या १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्यान अंत्योदय अभियान राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्हयात ग्रामसमृध्दी व स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रमासाठी निवडलेल्या १३१ ग्रामपंचायतीमधील ग्रामस्तरीय प्रशिक्षकांची कार्यशाळा बी. रघुनाथ सभागृह परभणी येथे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. करडखेलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.देसाई, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.एस.डी.खोडवे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 


याप्रसंगी पुढे बोलताना जिल्हाधिकारी पी.शिवशंकर म्हणाले की, अंत्योदय अभियानात ग्रामस्थांना शासनाच्या सर्व विभागाच्या कार्यक्रमांची माहिती देवून परिपूर्ण आराखडा तयार करावा. तसेच महिला अभियानामार्फत महिला सक्षमीकरण, जलसंधारण व पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी योजना, सौर उर्जा, शाश्वत उपजीवीका योजना, हरीतग्राम, कौशल्यविकास योजना, प्रधानमंत्री सडक योजना या सारख्या ग्रामीण विकासा संबंधित सर्व बाबीवर जागरुकता करुन ग्राम विकासाचा परिपूर्ण आराखडा तयार करावा यासाठी तयार करण्यात आलेले समृध्दी ॲपमध्ये तसेच कौशल्य पंजीकरण ॲप मध्ये अचुक माहिती भरुन सर्वांगींण ग्रामविकासासाठी प्रभावी उपयोग करावा असे सांगितले.प्रशिक्षणात अंत्योदय अभियानात करावयाच्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे तसेच समृध्दी ॲप व पंजीकरण ॲप वापरण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. गटविकास अधिकारी बायस, कांबळे, छडीदार, गंलाडे, श्रीमती गायकवाड व गट समन्वयक, अंत्योदय अभियासाठी निवडलेल्या १३१ ग्रामपंचायती अंतर्गत गावस्तरीय प्रशिक्षक उपस्थित होते.