रूरअर्बन मिशन अंतर्गत सुलतानपूर गावसमूहाची निवड

    दिनांक  22-Sep-2017बुलडाणा : शामा प्रसाद मुखर्जी रूरअर्बन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या गावसमूहाच्या विकासासाठी बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील सुलतानपूर या गावसमूहाची निवड करण्यात आली आहे. या गावसमूहात एकूण १३ गावांची निवड करण्यात आली असून या सर्व गावांचा सर्वांगिण विकास करण्यात येणार आहे. यासाठी अंतर्भूत असेलल्या सर्व प्रशासन यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.


सुलतानूपर गावसमूहातील गावांमध्ये रस्ते, पथदिवे, आरोग्याच्या सुविधा यांच्यासाठी लवकरच काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वांसाठी आवश्यक असलेल्या सर्व साधनांची आवश्यक सूची तयार करण्यास सुरुवात करावी असे पुलकुंडवार यांनी सांगितले. या गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा, संपूर्ण हगणदारीमुक्ती व नियमिती शौचालयांचा वापर, शोषखड्यांची निर्मिती करण्यात यावी. या गावांना अंतर्गत रस्त्यांनी जोडण्यात यावे. या गावसमूहाचा आराखडा त्वरित बनवावा. त्यामध्ये गाव विकासाच्यादृष्टीने आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा, असे देखील ते यावेळी म्हणाले.