गंगाखेडचे आमदार क्रेंद्रे अपघातात जखमी

14 Sep 2017 21:20:04

 

मुंबई : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या गाडीला काल रात्री उशिरा मुंबई बेंगळुूरू एक्सप्रेस वे वर अपघात झाला. यात केंद्रे यांच्या हाताला मार लागला असून त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या त्यांच्यावर पूणे येथील संचेती रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

केंद्रे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत. काही कामानिमित्त ते मुंबईला गेले होते तेव्हा मुंबईतून परत येत असताना हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान केंद्रे यांची तब्येत अाता स्थिर असून पुढील उपचार सुरू आहेत.

Powered By Sangraha 9.0